Quantcast
Channel: Lokmanas Marathi News, Lokmanas Latest Marathi News, Lokmanas News Headlines & Updates | लोकमानस मराठी ताज्या बातम्या at Loksatta.com | Loksatta
Viewing all articles
Browse latest Browse all 2339

लोकमानस : औषधांचा सोस वाढतो कशामुळे?

$
0
0

‘औषधांचा आजार…’ हा अग्रलेख (२४ डिसेंबर ) वाचला. औषधांचे वर्गीकरण व्हायटल, इसेंशियल आणि डिझायरेबल असे केले जाते.  यापैकी डिझायरेबल आणि इसेंशियल औषधांचा सर्रास अति उपयोग, दुरुपयोग केला जातोच, पण अगदी व्हायटल औषधेही दुरुपयोगातून सुटलेली नाहीत.  औषधांच्या लेखनचिठ्ठीची चिकित्सा करताना गमतीने असे म्हणतात- (१)  पेशंटला हवं म्हणून (२) डॉक्टरांना हवं म्हणून (३) केमिस्टला हवं म्हणून!

वस्तुस्थितीचे विदारक चित्र या विनोदात आहे. औषधे लिहून दिली तरच सल्ला फी देण्याची रुग्णांची मनोवृत्ती,  औषधाची गरज नाही हे समजून घेण्याची रुग्ण अथवा नातेवाईकांची इच्छा नसणे, औषध लिहून देण्यात होणारा फायदा (लिहिणारा, घेणारा, विकणारा सगळेच खूश) यामुळे औषधांचा सोस वाढत आहे, खोकल्याच्या औषधाची गरज नाही हे पटवून द्यायला किमान १५ मिनिटे लागतात, लिहायला १५ सेकंद!

औषधांच्या दुष्परिणामांच्या चर्चा करत अत्यंत गरजेच्या वेळी औषधे द्यायला नकार देणारे एकीकडे आणि औषधांचा अतिवापर आणि गैरवापर करणारे दुसरीकडे असा हा तिढा आहे. त्या पार्श्वभूमीवर हा अग्रलेख, व्यापक आरोग्य साक्षरतेची गरज अधोरेखित करणारा ठरतो.  – डॉ. श्रीकांत कामतकर, सोलापूर

फसवी जाहिरातबाजी, हेही कारण…

‘औषधांचा आजार…’ हा संपादकीय लेख (२४ डिसेंबर ) वाचताना विविध माध्यमांवर झळकणाऱ्या फसव्या जाहिराती आठवल्या.  विशेषत: दृक्श्राव्य माध्यमांतील या फसव्या जाहिरातींमुळे ग्राहक नाडला जातो, आवश्यकता नसतानाही नको ती औषधे खरेदी केली जातात. वृद्धत्व, सौंदर्य, स्फूर्ती, आरोग्य यांबाबत ज्या जाहिराती दाखविल्या जातात, त्या बघूनही अनावश्यक औषधे खरेदी केली जातात व त्यांचे सेवन केले जाते. याचा विघातक परिणाम शरीरावर घडून येत आहे. त्यामुळे आता, अन्न व औषध विभागाने नियम व अंमलबजावणी अधिक कठोर करून फसव्या जाहिरातींवर लगाम घालणे महत्त्वाचे ठरेल. विशेष म्हणजे या जाहिराती दाखविताना अगदी लहान अक्षरांमध्ये त्या उत्पादनाचे धोके किंवा त्रुटी नमूद केलेल्या असल्याने ग्राहकांच्या ते लक्षातच येत नाही. म्हणून औषधांच्या या फसव्या जाहिरातींना आळा घातला पाहिजे.  – प्रा. काळुराम शिंदे, कल्याण

ग्राहकांच्या संस्था काय करतात?

वैद्यकीय पेशा, औषधनिर्मिती करणाऱ्या कंपन्या आणि आणि वैद्यक यांच्या संगनमताने जो औषधाचा अतिरेक होतो आहे, यावर अधिक ऊहापोह होऊन सरकारने काही ठोस पावले उचलणे गरजेचे आहे. याकामी सरकारला स्वारस्य नसेल तर ग्राहक पंचायतीसारख्या ग्राहकहितैषी संस्थांनी लक्ष  घालून सरकारला जनतेचे आरोग्य  आणि आर्थिक लूट पटवून देणे आवश्यक आहे. अलीकडे काही डॉक्टर स्वत:ची औषध दुकाने थाटून महागडी औषधे रुग्णाला घ्यायला भाग पाडतात. सामान्य आजारी माणसालासुध्दा दहा दहा दिवसांचा कोर्स देतात आणि स्वत:चे उखळ पांढरे करून घेतात. जेनेरिक औषधे हे डॉक्टर लिहून देत नाहीत. या सर्व गोष्टींचा साकल्याने विचार करून काही नियम करणे आणि या अपप्रवृत्तीला आळा घालणे शक्य आहे.  – जगन्नाथ पाटील, उमराळे (नालासोपारा)

धर्माची धुंदीच हवी की संवैधानिक लोकशाही

‘फाळणीनंतर उरलेल्या ड्टूड्टागाच्या तुकडय़ात हिंदूंचेच वर्चस्व राहावे, असे हिंदूंना वाटले, तर त्यात गैर काय?’ अशा शीर्षकचे ‘लोकमानस’मधील पत्र वाचले. यामध्ये, ‘बहुसंख्य समुदायाला जे योग्य वाटते, तसेच केले जाणे, तसेच निर्णय घेतले जाणे’ हे लेखकास अपरिहार्य वाटते. मग बहुसंख्याकांनी जाणाऱ्या- येणाऱ्यास जबरदस्तीने ‘जय श्री राम’ म्हणायला लावणे, तसे न म्हणल्यास जमाव करून मारणे (मॉब लिंचिंग) किंवा एखादे राज्यच शाकाहारी ठरवणे, बहुसंख्याक अशा नावावर संवैधानिक  पायमल्ली करणे या सगळय़ा गोष्टी अपरिहार्यच समजायच्या का? आणि त्या तशा समजल्याच तर मग लोकशाही, तिची मूल्ये आणि लोकशाहीचे तीन स्तंड्टा, कायदा आणि सुव्यवस्था किंवा मुदलात संविधान यांची गरजच काय होती?  सगळय़ा गोष्टी बहुसंख्य म्हणतात त्या योग्य असल्या, तर एवढा मोठा देश संविधान या एकाच धाग्याने बांधला गेला नसता.   मुळात सध्या देशात जे काही चालू आहे ते पाहून लोकशाही आणि संविधानाची मूल्ये जाणणाऱ्या कोणालाही सर्व काही आलबेल आहे असे वाटू शकणार नाही. तेव्हा विचारी जनांनी तरी धर्माची धुंदी आणि नशा बाजूला ठेवून लोकशाहीस पूरक अशा ड्टाूमिका घ्याव्यात.  – गणेश गलांडे,  इचलकरंजी

प्रताप वेलकर यांच्या काही आठवणी..

प्रताप मोतीराम वेलकर यांच्या निधनाची बातमी ( लोकसत्ता, २१ डिसेंबर) आणि ‘व्यक्तिवेध’ (२२ डिसेंबर) वाचून दु:ख झालं. माझा आणि त्यांचा संपर्क एका पुस्तकाच्या निमित्ताने आला. ‘लोकमान्य टिळक आणि डॉक्टर वेलकर’ हे ते पुस्तक. अनेक र्वष सखोल संशोधन आणि अड्टयास करून त्यांनी ते लिहून काढलं होतं. त्यांचे वडील डॉ. मोतीराम बाळकृष्ण वेलकर हे लोकमान्य  टिळकांबरोबर इंग्लंडला गेले होते. त्या वेळच्या डायऱ्या,  पत्रं, वृत्तपत्रांतली कात्रणं, फोटो असा प्रचंड दस्तऐवज प्रतापरावांनी सांड्टाळून ठेवला होता. या सर्व साधनांचा अड्टयास व उपयोग करून त्यांनी हे पुस्तक लिहिलं. प्रतापराव स्वत: पेशाने आर्किटेक्ट होते. त्यामुळे अशा प्रकारचं इतिहास संशोधनात्मक लिखाण करण्याचा त्यांना पूर्वानुड्टाव नव्हता, म्हणून त्यांचे मित्र-मार्गदर्शक डॉ. अरुण टिकेकर यांनी यांच्या सल्ल्यानुसार, मी या पुस्तकाच्या संपादनाचं काम स्वीकारलं. प्रतापराव हे  ऐतिहासिक माहितीचं एक चालतंबोलतं ड्टांडार होते. पाठारे प्रड्टा ज्ञातीचा इतिहास तर त्यांच्या मर्मबंधातली ठेव होती; अर्थात हे नंतर त्यांनी लिहिलेल्या ‘पाठारे प्रड्टूंचा इतिहास’ या पुस्तकानेच सिद्ध केलं. दुसरं म्हणजे त्यांना स्वत:जवळ असलेली माहिती दुसऱ्यांना देण्याची कळकळ होती, उत्कट इच्छा होती आणि ती ते कुणालाही निरपेक्षपणे देत असत. तिसरं म्हणजे आपल्या ज्ञातीतले शिवकर बापूजी तळपदे या ‘मरुत्सखा’ या पहिल्यावहिल्या विमानाची निर्मिती करणाऱ्या व्यक्तीविषयी त्यांना नितांत आदर होता सहार विमानतळाच्या रस्त्यावर त्यांनी ‘शिवकर बापूजी तळपदे चौक’ या नावाचं एक देखणं स्मारक उड्टारलं तेव्हा त्यांना कर्तव्यपूर्तीचा जो आनंद झाला तोही मी पाहिलेला आहे. – मृदुला प्रड्टाराम जोशी,  मुंबई

loksatta@expressindia.com

The post लोकमानस : औषधांचा सोस वाढतो कशामुळे? appeared first on Loksatta.


Viewing all articles
Browse latest Browse all 2339

Trending Articles